पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या करण ओबेरॉयचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला

करण ओबेरॉय

 बलात्काराच्या आरोपाप्रकरणी पोलीस कोठडीत असलेला अभिनेता करण ओबेरॉयचा जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयानं फेटाळला आहे.  मुंबई न्यायालयाने त्याला ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ५ मे रोजी महिलेच्या तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात दिंडोशी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती.

संबधीत महिला ही जादुटोणा करते, तिचं एकतर्फी प्रेम असून तिला करणशी लग्न करायचं होतं. लग्नासाठी ती बळजबरी करत असल्याची  बाजू करणच्या वकिलानं न्यायालयात मांडली होती. या प्रकरणाची सूनावणी करताना दिंडोशी सत्र न्यायालयानं करणचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. 

पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, डेटिंग अ‍ॅप्लिकेशनद्वारे दोघांची ओळख झाली. ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाल्यानंतर संशयित आरोपीने महिलेला लग्नाचे वचन दिले. त्याने पीडितेला आपल्या घरी बोलवले. घरी गेल्यानंतर नारळ पाण्यातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवून पैसे उकळल्याचा आरोप पीडितेने केला आहे. २५ ऑक्टोबर २०१८ मध्ये करणनं पैसे उकळल्याचं तिनं म्हटलं आहे. 

मात्र करणनं कधीही तिला लग्नाचं आमिष दाखवलं नाही त्यानं तिला दूर राहण्यासही बजावलं असल्याचं करणचे वकील म्हणाले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत करणच्या वकीलांनी करणची बाजू मांडली होती.  जामीन मिळण्यासाठी करण ओबेरॉयने दिंडोशी सत्र न्यायालयात केलेल्या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. दोन्ही पक्षांच्या बाजू सविस्तरपणे ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.