पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कस्तुरबामधून परत पाठवलेल्या रुग्णाला कोरोना

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाची लक्षणे आढळल्यानं कस्तूरबा रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीस रुग्णलयातील डॉक्टरांनी औषधं देऊन परत पाठवलं. मात्र काही दिवसांत तब्येत खालावल्यानं संबधित व्यक्तीची खासगी रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यात आली ही चाचणी  पॉझिटिव्ह निघाल्यानं खळबळ उडाली आहे.
सध्या राज्यात कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळले आहेत ते  परदेशातून प्रवास करुन आले आहेत किंवा ज्यांना कोरोना झाला आहे अशाच व्यक्तींच्या  संपर्कात आले आहेत.  त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांच्या प्राधान्यानं कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.  

मुंबई-पुणे येथे कोरोना तपासणी केंद्रांना मान्यता

संबधीत कोरोना बाधीत रुग्ण  काही दिवसांपूर्वी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी गेला होता.  त्याला ताप, थंडी, सर्दी ही कोरोनाची  प्रमुख लक्षणे आढळली होती. मात्र तो परदेशातून प्रवास करुन आला नव्हता किंवा  त्याच्या संपर्कात असलेल्या कोणत्याही व्यक्तीला या रोगाची लागण झाली नव्हती, त्यामुळे कस्तुरबा रुग्णालयातून काही औषधं देऊन त्याला परत पाठवण्यात आलं.

मात्र तब्येतीची काळजी वाटल्यानं हा व्यक्ती चर्नी रोडमधील सैफी रुग्णालयात दाखल झाला. डॉक्टरांना शंका आल्यानं त्यांनी संबंधीत रुग्णाचे टेस्ट सॅम्पल कस्तुरबा रुग्णालयात पाठवले,  चाचणीअंती या रुग्णाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं. या रुग्णाला आता कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आलं असून त्याला विलगिकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. 

आरोग्यमंत्र्यांकडून 'मीच माझा रक्षक'चा संदेश

याबद्दल हिंदुस्थान टाइम्सनं महापालिकेशी संपर्क साधला असता , संबधित रुग्णामध्ये तेव्हा कोरोना विषाणूशी संबधीत ठोस अशी लक्षणे तेव्हा आढळली नव्हती, त्यामुळे कदाचित त्याला रुग्णालयात भरती केलं नसावं, असं पालिकेच्या उपकार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह म्हणाल्या.