पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आणि ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. कर्जत - भिवपूरी रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत.

कलम ३७० रद्द करण्याविरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय 

कर्जत -भिवपूरी स्थानका दरम्यान सकाळी पावणे दहाच्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेला. कर्जतवरुन सीएसएमटीच्या दिशेने लोकल जात असताना अचानक मोठा आवाज आला. मोटरमनने तातडीने ब्रेक दाबला त्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. लोकलमधून उतरुन पाहिल्यानंतर रेल्वे रुळाला तडागेल्याचे निदर्शनास आहे. 

निर्भया प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

रेल्वे रुळाला तडा गेल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले. रूळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र लोकल वाहतूक उशिरानेच सुरु आहे. 

दिल्ली हिंसाचाराचे ४६ बळी, नाल्यात मिळाले आणखी ४ मृतदेह

दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून मध्य रेल्वेची लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येथील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईच्या दिशेने कामासाठी येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांना लेटमार्क लागणार आहे. सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. 

तृतीयपंथीयांसाठी घर बांधण्याकरता अक्षयनं दिले १.५ कोटी