पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आम्ही १६९'!, महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकला

बहुमत चाचणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विश्वासदर्शक ठराव सिध्द करण्यात यशस्वी झाले आहे. ठाकरे सरकारच्या बाजूने १६९ मतं पडली तर विरोधात शून्य मतं पडली आहे. तर माकप, एमआयएम, मनसेच्या ४ आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. बहुमत चाचणीवेळी भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला.

बहुमत चाचणीपूर्वी शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर सभागृह पूर्ण विश्वास व्यक्त करत असल्याचा प्रस्ताव काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहात मांडला. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. या प्रस्तावाला शिवसेनेचे नेते सुनील प्रभू आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर हा प्रस्ताव पारित करण्यात आला. सुरुवातीला आवाजी मतदान घेण्यात आले.  त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिरगणती प्रक्रिया करण्यात आली. 

'चिखलीकरांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका'

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मतांची मोजणी करण्यात आली. महाविकास आघाडीच्या बाजूने १६९ आमदारांनी मतदान केले. तर ४ आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. दरम्यान, या मतदान प्रक्रियेमध्ये उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई हे विधानसभेचे सदस्य नसल्याने त्यांनी मतदान केले नाही.

उद्धव ठाकरेंचा शपथविधी बेकायदाः चंद्रकांत पाटील