पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

३९ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यातील कोरोना विषाणूग्रस्तांचा आकड्याने दोनशेचा टप्पा पार केला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात १७ नवे रुग्ण आढळले आहेत. यात मुंबईतील ८, पुण्यातील ५,  नागपूरमधील २ तर नाशिक आणि कोल्हापूरमधील प्रत्येकी एक-एक रुग्णांचा समावेश आहे. सोमवारी राज्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची पुष्टीही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. यातील एकाच मृत्यू हा मुंबईत तर एका रुग्णाने पुण्याच्या खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या रुग्णांना  हृदयरोग,मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहितीही राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. या दोन रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्यातील करोना विषाणूच्या मृतांचा आकडा हा १० वर पोहचला आहे. 

विस्थापित कामगारांच्या व्यवस्थेसाठी राज्य सरकारकडून ४५ कोटींचा निधी

राज्यातील आतापर्यंत ३९ कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यात मुंबई-१४ , पुणे-७, पिंपरी चिंचवड-९, यवतमाळ-३, अहमदनगर- १, नागपूर-४, औरंगाबाद- १ रुग्णांचा समावेश आहे. सध्याच्या घडीला राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात १७१ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. 

कोरोनाग्रस्ताच्या अंत्यविधीसाठी 'प्रोटोकॉल' पाळावा लागणार

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात लॉकडाऊनची  घोषणा करण्यात आली आहे. कोरोनावर कोणताही उपचार नाही. याच्या संक्रमणावर आवार घालण्यासाठी गर्दी न करणे ही एकमेव खबरदारीचा पर्यायच आपल्याकडे आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जमाव होऊ नये यासाठी पोलिस कर्मचारी रात्रंदिवस बंदोबस्त देत आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Total 10 Death Covid 10 positive patient in maharashtra 171 under Treatment in Hospital Says State Health Minister Rajesh Tope