पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १ एप्रिलपासून टोलवाढ

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास यापुढे महागणार आहे.  १ एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलवाढ होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा निर्णय घेतला आहे. एमएसआरडीसीने टोल वसुलीचे काम पुन्हा आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सला दिले आहे. त्यामुळे आता पुढची १५ वर्षे आयआरबी टोलवसुली करणार आहे. 

सरकार हादरेल असं आंदोलन केलं: चंद्रकांत पाटील

टोलवाढ होणार असल्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या कार चालकांना आता २३० रुपये टोल भरावा लागतो. १ एप्रिलपासून त्यांना २७० रुपये टोल भरावा लागणार आहे. म्हणजे कारच्या टोलमध्ये ४० रुपयांनी वाढ केली मिनी बससाठी सध्या ३५५ रुपये टोल भरावा लागतो. १ एप्रिलपासून ४२० रुपये टोल भरावा लागणार आहे. म्हणजे मिनीबसच्या टोलमध्ये ६५ रुपयांनी वाढ केली आहे. 

भाजपतून निलंबित आमदाराचे विधानसभा सदस्यत्वही रद्द

दरम्यान, बससाठी सध्या ६७५ रुपये टोल भरावा लागतो. १ एप्रिलपासून ७९७ रुपये टोल भरावा लागणार आहे. म्हणजे बसच्या टोलमध्ये १२२ रुपयांनी वाढ केली आहे. ट्रकसाठी सध्या ४९३ रुपये टोल भरावा लागतो. १ एप्रिलपासून ५८० रुपये टोल भरावा लागणार आहे. म्हणजे ट्रकच्या टोलमध्ये ८७ रुपयांनी वाढ केली आहे. तर क्रेन आणि अवजड वाहनांना सध्या १,५५५ रुपये टोल द्यावा लागतो त्यांना १ एप्रिलपासून १,८३५ रुपये टोल भरावा लागणार आहे. म्हणजेच क्रेनसाठीच्या टोलमध्ये २८० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 

दिल्ली हिंसाचारः गोळीबार करणाऱ्या 'त्या' युवकाला अटक