पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गणेशोत्सवानिमित्त कोकण मार्गावर टोलमाफी

गणेशभक्तांना टोलमाफी

गणेशोत्सव म्हटलं की सर्वांना कोकण आठवते. मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील आपल्या गावी जात असतो. त्यांच्यासाठी राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीमध्ये टोलमाफी करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्राकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. गणेशोत्सवापूर्वी ट्राफिक नियोजनासंदर्भात आयोजित केलेल्या आढवा बैठकी दरम्यान त्यांनी ही माहिती दिली. 

सोलापूरातील भाविकांच्या गाडीला अपघात; ५ जणांचा मृत्यू

कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही मार्गावर ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबरपर्यंत टोलमाफी करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे. कोकणामध्ये जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकारक व्हावा यासाठी सरकारने ही घोषणा केली आहे. त्याचसोबत मुंबई-गोवा महामार्गावची पाहणी करुन त्यावरी खड्डे त्वरीत भरण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. तसंच परिवहन विभागाकडून कोकण मार्गावर गणेशोत्सवानिमित्त जादा एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले. 

पहिला सेट जिंकून सुमितचा फेडररला धक्का, पण सामना