पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पश्चिम महाराष्ट्रातील महापुराचे हे सुद्धा एक कारण...

शिरोळपासून तीन किलोमीटरवर असलेल्या शिर्टीमध्ये पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी लष्करी

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारामध्ये आलेल्या महापूरामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या जिल्ह्यांमध्ये कमी वेळेत झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचे सरकार सांगते आहे. पण या जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण होऊ शकते, याची जाणीव प्रशासनाला लवकर झाली नाही आणि पूरस्थिती हाताळण्यात सुरुवातीच्या टप्प्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका आता होऊ लागली आहे. पूर निर्माण होऊ शकतो, याची सूचना देणारी व्यवस्था सरकारकडे आहे का, असाही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

कृष्णा नदी खोऱ्यामध्ये कमी वेळेत झालेल्या मुसळधार पावसामुळेच पूर आल्याचे म्हणणे काही तज्ज्ञांनी आणि अभ्यासकांनी फेटाळले आहे. एकीकडे या ठिकाणी पडत असलेला मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे या ठिकाणच्या धरणांमधून होणारा विसर्ग यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण १२ मोठी धरणे आहेत. हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असताना या भागातील धरणांमधून आधीपासूनच पाणी सोडण्यास सुरुवात का झाली नाही, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स, पीपल संघटनेच्या एका पोस्टमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आहे.

पूरग्रस्तांना मदतीच्या धान्यावर भाजप आमदाराचा फोटो, विरोधकांची टीका

धरणतज्ज्ञ परिणीती दांडेकर आणि हिमांशू ठक्कर यांनी म्हटले आहे की, धरणे तुडूंब भरणे आणि या जिल्ह्यांमध्ये पूर येणे या दोन्ही घटना एकाचवेळी घडल्या आहेत. ५ ऑगस्टलाच ही सर्व धरणे कशी काय भरली? २५ जुलैपासूनच या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात का करण्यात आली नाही. जर या धरणांमधून (कोयना, वारणा, राधानगरी) २५ जुलैपासूनच पाणी सोडण्यास सुरुवात झाली असती, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या धरणांमध्ये पाणी साठविण्यास जागा शिल्लक असती. यामुळे या तिन्ही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असताना पूराची तीव्रता कमी होण्यास मदतच झाली असती. धरणांतील विसर्ग योग्य पद्धतीने केला असता, तर पुराची तीव्रता नक्कीच कमी करता आली असती, असे या तज्ज्ञांनी म्हटले आहे.

जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे म्हणाले की, जलसंपदा विभागाच्या कामकाजाच्या पद्धतीवरून एकूणच सध्याची आणि भविष्यातील पूरस्थिती हाताळण्याच्या त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पूरव्यवस्थापन हे केवळ एका धरणापुरते मर्यादितपणे न करता ते संबंधित नदीच्या संपूर्ण प्रवासासाठी केले पाहिजे. पण हे करण्यासाठी आवश्यक तांत्रिक क्षमता आणि डेटा आपल्याकडे उपलब्ध नाही. आपल्या विभागांकडे या क्षेत्रातील तज्ज्ञही नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

पंचगंगेच्या पाणी पातळीत घट, पण कोल्हापूरमधील पूर कायम

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आता धरण पूर्ण भरल्यानंतर मगच त्यातून विसर्ग सुरू करण्याचा प्रकार रूढ झाला आहे, असे पाटबंधारे विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.