पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत जानेवारीत सर्वाधिक थंडी, दशकातील नवा विक्रम

मुंबईत थंडी

गेल्या दहा  वर्षांत प्रथमच मुंबईकरांनी कमालीची थंडी अनुभवली. जानेवारीत गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत प्रथमच कमाल तापमान २५ अंश सेल्शिअसपर्यंत घसरल्याचे हवामान खात्याने सांगितले. यापूर्वी २०१४ साली जानेवारी महिन्यात मुंबईत पारा २६ अंश सेल्शिअसच्या खाली घसरला होता. तर २००९ साली मुंबईत हिवाळ्यात कमालीचे तापमान घटले होते. 

त्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर मुंबईकरांनी थंडी अनुभवली. अनेक ठिकाणी गार वारेही वाहू लागले. शुक्रवारपर्यंत मुंबईत तापमान कमी राहणार असल्याचा  अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.  गुरुवारी किमान तापमान हे १५.४ अंश सेल्शिअस होतं तर शुक्रवारी किमान तापमान हे १४ अंश सेल्शिअस असणार आहे. 

मोदींच्या राज्यात तरुणाईवर तुरुंगवास भोगण्याची वेळ : प्रकाश आंबेडकर

 शहरातील बऱ्याच ठिकाणचे तापमान गुरुवारी खूपच कमी होते.  सांताक्रूझ आणि कुलाबा येथे अनुक्रमे १५.४ अंश से. आणि १७.६ अंश से. किमान तापमान नोंदले गेले. बोरिवलीत १३ अंश सेल्शिअस , गोरेगाव १४ अंश सेल्शिअस, कांदिवली १५ अंश सेल्शिअस तर नवी मुंबई, पनवेलमध्ये १२ अंश से. किमान तापमान नोंदले गेले.

केवळ मुंबईतच नाही तर महाराष्ट्राच्या अनेक भागात  थंडीची लाट पहायला मिळाली. मात्र आठवड्या अखेरीस तापमानात वाढ होईल असंही हवामान खात्यानं सांगितलं आहे. 

DSP देविंदर सिंहच्या प्रकरणावरुन राहुल गांधींचा मोदी-शहांवर निशाणा