पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : तीन वर्षांचा मुलगा मुंबईत नाल्यात पडला, शोध सुरू

घटनास्थळाचे सीसीटीव्हीवरून घेतलेले छायाचित्र

मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर आंबेडकर चौकाजवळ इटालियन कंपनीजवळ एक तीन वर्षांचा मुलगा नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण उपलब्ध झाले असून, तो मुलगा नाल्याच्या मॅनहोलचे झाकण उघडे असल्यामुळे त्यामध्ये पडताना दिसतो आहे. दिव्यांश असे या मुलाचे नाव आहे. तब्बल नऊ तास झाले, तरी या मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही.

बुधवारी रात्री ११.२४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर तातडीने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, दिव्यांशचा शोध घेतला जातो आहे. 

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रकार घडताहेत. काही ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी गटारांची झाकणेही काढली जात आहेत. त्यामुळे अशा स्वरुपाच्या घटना मुंबईत घडल्याचे पाहायला मिळते.