पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत कारला भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

मुंबईत कारला अपघात

मुंबईमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. वरळी येथे भरधाव बीएमडब्ल्यू कार डिव्हायडरला धडकून अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली. तिच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरु आहे.

भारतात कोरोनाचा दुसरा बळी; दिल्लीत महिलेचा मृत्यू

वरळीच्या मेला सेस्टॉरंट जंक्शनवर हा अपघात झाला आहे. महिला ही कार चालवत होती. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट डिव्हायडरला धडकली. हा अपघात ऐवढा भीषण होता की अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक महिला गंभीर जखमी झाली. अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. 

मोदींच्या आवाहनाला पाकिस्तान वगळता सार्कच्या सर्व देशांचा पाठिंबा

अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव नमिता चंद असे आहे. तिच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नमिता चंद अंधेरीमध्ये राहत होत्या. अपघातामध्ये नमिता यांची आई, एक नातेवाईक आणि लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचा तपास वरळी पोलिसांकडून सुरु आहे. 

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८१ वरः आरोग्य मंत्रालय