पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खूशखबर! गणेशोत्सव काळात मुंबई-गोव्या दरम्यान धावणार २०० रेल्वे

रेल्वे (संग्रहित छायाचित्र)

मध्य आणि पश्चिम रेल्वेने मुंबईतील कोकणवासियांसाठी खूशखबर दिली आहे. गणेशोत्सव काळात कोकणमार्गे मुंबई ते गोवा दरम्यान २०० विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. 

या विशेष रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), पनवेल, पुणे, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि वडोदरा स्थानकावरुन चालवल्या जातील.

'कितीही चौकशा होऊ द्या, पण मी तोंड बंद ठेवणार नाही'

या विशेष रेल्वे मध्य रेल्वेच्या मुख्यतः एलटीटी-पेरनम, पनवेल-थिविम, पुणे-करमाळी-पनवेल, पनवेल-सावंतवाडी रोड-पनवेल, सीएसएमटी-सावंतवाडी रोड आणि सीएसएमटी-रत्नागिरी मार्गावरुन धावतील.

पश्चिम रेल्वेच्या विशेष रेल्वे या मुंबई-सेंट्रल-थिविम, अहमदाबाद-सावंतवाडी रोड-अहमदाबाद, अहमदाबाद-थिविम-अहमदाबाद, वडोदरा-सावंतवाडी-वडोदरा आणि मुंबई-सेंट्रल-मंगळुरु-मुंबई सेंट्रल मार्गे धावतील. 

गणेश चतुर्थी काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय कमी करण्याचे ध्येय मध्य रेल्वेचे असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार जैन यांनी सांगितले. या विशेष रेल्वेंना सर्वसाधारण, स्लिपर आणि एसीचे जादा कोचेस जोडले जाणार आहेत. काही विशेष रेल्वेंना दोन स्लिपर क्लास कोचेस तर काहींना एक स्लिपर आणि एक एसी थ्री टियर कोच जोडले जाणार आहेत.

प्रवीण सारखं टोकाचं पाऊल उचलू नका, राज यांची कळकळीची विनंती