पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक: धावत्या एक्स्प्रेसमधून महिलेची बॅग हिसकावली

धावत्या एक्स्प्रेसमध्ये चोरी

रेल्वेतून प्रवास करताना महिलांनी थोडी सावधानता बाळगली पाहिजे. कारण धावत्या रेल्वेमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक चोर धावत्या एक्स्प्रेसच्या डब्यात शिरतो आणि त्याठिकाणी उभ्या असलेल्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पळ काढतो. एक्स्प्रेसच्या डब्यात लावलेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे.  अचानक झालेल्या या प्रकारामुळे रेल्वे प्रवासी घाबरतात.    

JNU हिंसाचाराशी संबंधित सदस्यांचे मोबाईल जप्त करा: दिल्ली हायकोर्ट

हा व्हिडिओ मुंबईतील असून इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ठाणे-कळवा दरम्यान पारसिक बोगद्यात हा प्रकार घडल्याचे सांगतले जात होते. मात्र हा व्हिडिओ मुंबईतील नसून भोपाळमधील असल्याची माहिती आता समोर आली आहे. चोर ज्या महिलेची बाग हिसकावून पळ काढतो ती महिला पोलिस आहे. 

सुशिक्षितांनाही शिकवावे लागते याचे हे योग्य उदाहरण, लेखींचे उत्तर

२३ सप्टेंबर रोजी दिल्लीहून भोपाळला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली आहे. सकाळी ६ वाजता शताब्दी एक्स्प्रेस भोपाळ स्थानकावर येत होती. त्याचवेळी एक्स्प्रेसचा वेग कमी झाल्यामुळे चोराने गाडीत प्रवेश केला आणि महिला पोलिसाची बॅग हिसकावून तो पळून गेला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

'राज्याचा खेळखंडोबा केलाय, हे दिवस बघण्यापेक्षा मेलेलं बरं'