पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नेतृत्त्वावर विश्वास नसल्यानेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजपत प्रवेश- गिरीश महाजन

गिरीश महाजन

जनतेचा, कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश घेतला जात असल्याचे वक्तव्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले. शिवेंदसिंह राजे भोसले, वैभव पिचड, कालिदास कोळंबकर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माध्यमांबरोबर संवाद साधला. काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था व्हेंटिलेटरच्या पलीकडे झाल्याचा टोला ही त्यांनी लगावला.

शिवेंद्रसिंह राजेंचं भाजपत जाण्याचं ठरलं, आमदारकीचा दिला राजीनामा

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची विश्वासहर्ताच राहिलेली नाही. नेतृत्वाकडून थोपवण्यात येणाऱ्या घराणेशाहीला कार्यकर्ते वैतागले आहेत. सर्वांचा आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. १५ दिवसांपूर्वी आघाडीच्या ८३ पैकी ५० च्यावर आमदार संपर्कात असल्याचे मी म्हटले होते. हा आकडा आणखी वाढू शकतो, असे ते म्हणाले.

पवारसाहेबांनी आत्मचिंतन करण्याची गरज, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला

काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून येणाऱ्या आमदारांना आपापल्या भागातील कामे करायची आहेत. शेतकरी आणि सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून ते पक्षात येत आहेत. कोणत्याही अटीशिवाय त्यांना पक्षात प्रवेश दिल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरेंनी घेतली जयंत पाटलांची भेट; ईव्हीएमवर चर्चा ?

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:they have no trust on party leaders thats whya the enter in to bjp says minister girish mahajan