पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेता करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेवर हल्ला

करण ओबेरॉय

अभिनेता करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेवर शनिवारी पहाटे  दोन अज्ञात हल्लेखोरानं हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर करणविरोधात केस मागे घेण्याचं धमकीपत्र पीडितेवर फेकलं असल्याची  माहिती पोलिसांनी दिली. 

 लोखंडवाला परिसरात सकाळी ६.३० वाजता वॉकला गेले असताना,  दोन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची तक्रार पीडितेनं ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. हे हल्लेखोर बाईकवरून आले असल्याची माहिती ओशिवरा पोलिस स्थानकाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी एएनआयशी बोलताना दिली. 

पीडितेवर धारधार शस्त्रानं हल्ला करण्यात आला, यात पीडित महिला जखमी झाली असल्याची माहिती संबधित महिलेच्या वकिलानं दिली.  तक्रारीवरून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

काय आहे प्रकरण
लग्नाचे आमिष दाखवून करण ओबेरॉयनं बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेनं केला. त्याचप्रमाणे बलात्काराचे चित्रीकरण करून ते प्रसारित करण्याची धमकी करणनं दिल्याचा पीडित महिलेनं आरोप केला. पीडित महिलेच्या आरोपावरून करण ओबेरॉयला अटक करण्यात आली. 
गेल्याच आठवड्यात दिंडोशी सत्र न्यायालयानं करण ओबेरॉयचा जामीन अर्ज फेटाळला, त्यामुळे करण ओबेरॉय कोठडीत आहे.