पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : उत्तुंग इमारतीवरचा धबधबा सोशल मीडियावर व्हायरल

उत्तुंग इमारतीवर धबधबा

मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढले. दोन दिवस सतत कोसळत असणाऱ्या पावसानं तिसऱ्या दिवशी क्षणभर विश्रांती घेतली आहे. मुंबईची लाईफलाइन समजली जाणारी लोकलसेवा बुधवारी बंद होती, दळणवळणाची सोय उपलब्ध नव्हती. पावसामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. 

 ७४ व्या वर्षी 'ती' झाली जुळ्या मुलींची आई

मुंबईच्या मुसळधार  पावसातील असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईतील न्यू कफ परेड भागातील हा व्हिडिओ असून एका उत्तुंग इमारतीवरून चक्क पावसाचं पाणी धो- धो कोसळत होतं. 

एका धबधब्याप्रमाणे ते दिसत होतं. हे पाणी नेमकं कशामुळे खाली कोसळत होतं, त्याचा अंदाज बांधणं अवघड होतं. मात्र उत्तुंग इमारतीवरून कोसळणारा हा धबधबा पाहणं स्थानिकांसाठी मज्जा आणि आश्चर्यापेक्षा कमी नव्हतं.