पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वडिलांनी दुचाकी न दिल्यामुळे मुलाने स्वत:ला पेटवले

स्वत:ला पेटवले (प्रातिनिधीक फोटो

नवी मुंबईमध्ये एका तरुणाने कॉलेजमध्ये स्वत:ला पेटवून घेतल्याचा प्रकार घडला आहे. वडिलांनी कॉलेजचा जाण्यासाठी दुचाकी दिली नाही. याचा राग आल्यामुळे तरुणाने स्वत:ला पेटवून घेतले. शिवम दीपक यादव (१७ वर्ष) असं या तरुणाचे नाव आहे. तो ११ वीमध्ये शिक्षण घेत आहे. या घटनेमध्ये तो ९० टक्के भाजला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 

चिदंबरम यांना पुन्हा झटका, जामीन अर्ज फेटाळला
 
कळंबोलीतील अमरदीप सोसायटीमध्ये शिवम यादव राहतो. शिवम हा कळंबोलीतील न्यू सुधागड हायस्कूलमध्ये ११ वी सायन्सचे शिक्षण घेत आहे. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शिवम कॉलेजला जाण्यासाठी निघाला. त्याने वडील दीपक यादव यांच्याकडे कॉलेजला जाण्यासाठी दुचाकी मागितली. त्यांनी न दिल्यामुळे शिवमला राग आला. रागारागाने शिवम कॉलेजमध्ये केला.

'घाबरु नका शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी, नुकसान भरपाई लवकर

कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या शौचालयात जाऊन त्याने स्वत:ला पेटवून घेतले. या घटनेमुळे सुधागड शाळेमध्ये एकच खळबळ उडाली. शाळेतील शिक्षकांनी जखमी अवस्थेत शिवला एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र शिवम ९० टक्के भाजल्यामुळे त्याला ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. शिवमवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

'तीन अंकी नाटकाच्या खेळात आम्हीच यशस्वी होणार'