पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धारावीतील कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू

कोरोना विषाणूमुळे मुंबईत एका वृद्ध नागरिकाचा मंगळवारी मृत्यू झाला. (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबईमध्ये सर्वात मोठी लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या धारावी झोडपट्टीमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. या रुग्णाचा उपचारा दरम्यान सायन रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच  खळबळ उडाली आहे. मुंबईमध्ये कोरोना विषाणूने कहर केला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येतही वाढ होत चालली आहे. 

राज्यातील कोरोनाच्या बळींचा आकडा १६ वर

धारावीमध्ये राहणाऱ्या एका ५६ वर्षीय व्यक्तीला खोकला आणि ताप येत होता. त्याने धारावीतील स्थानिक डॉक्टरकडून उपचार घेतले. मात्र गुण न आल्यामुळे त्याला २९ मार्च रोजी सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. आज त्याचा तपासणी अहवाल आला यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर उपचारा दरम्यान संध्याकाळी ७ वाजता त्याचा मृत्यू झाला. 

कोरोनाविरोधात भारत-चीन मिळून लढावे लागेल : मोदी

दरम्यान, या रुग्णावर उपचार करणाऱ्या आणि त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेला रुग्ण धारावतील ज्या परिसरात राहतो त्याठिकाणी भितीचे वातावरण पसरले आहे. मृत्यू झालेला रुग्ण ज्या बिल्डिंगमध्ये राहत होता ती सील करण्यात आली आहे. तर त्याच्या ७ नातेवाईकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती महानगर पालिकेने दिली आहे. 

कोरोना : दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा रद्द!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:the person from dharavi in mumbai who had tested positive for coronavirus has died at sion hospital