पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यपाल भेट लांबणीवर

भगतसिंह कोश्यारी

अतिपावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यासाठी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. परंतु, ही भेट आता लांबणीवर पडली आहे. नियोजनानुसार शनिवारी दुपारी ४.३० वाजता ही बैठक होणार होती. या शिष्टमंडळात तिनही पक्षाचे प्रमुख नेते जाणार होते. तिन्ही पक्ष एकत्र येण्याची ही पहिलची वेळ होती. तत्पूर्वीच ही बैठक रद्द करण्यात आली. 

तिन्ही पक्षांचे नेते हे राज्यातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागाच्या दौऱ्यावर आहेत. अनेकजण स्वतः बांधावर असल्यामुळे त्यांना मुंबईत येता आलेले नाही. त्यामुळे लवकरच त्याबाबत नियोजन करुन आम्ही सर्वजण राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेऊ, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी दिली. 

दिलासा!, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यपालांकडून मदतीची घोषणा

दरम्यान, परतीच्या पावसाने मोठा फटका बसलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्यपालांनी दिलासा दिला आहे. दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्यांना शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. खरिपासाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ८ हजार रुपये तर फळबागांसाठी प्रति हेक्टर १८ हजार रुपये मदत दिली जाणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:The meeting of the delegation of the three parties NCP Congress and Shiv Sena with the Governor has been postponed