पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंचा शपथविधी बेकायदाः चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर घणाघाती टीका केली. तसेच शिवाजी पार्कवर घेण्यात आलेला शपथविधी हा बेकायदा असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रोटोकॉलनुसार शपथविधी झालेला नाही. शपथविधी घेताना कोणाची नावे घ्यायची नसतात. आम्हालाही छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. पण प्रोटोकॉलमध्ये हे येत नाही. त्यामुळे एका आमदाराने हा शपथविधीच बेकायदा ठरवावा यासाठी राज्यपालांकडे धाव घेतली आहे. त्यांनी राज्यपालांनी न्याय द्यावा नाहीतर सर्वोच्च न्यायालयात जाऊ असे म्हटल्याचे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. 

काँग्रेसचे नाना पटोले महाविकास आघाडीचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

ते पुढे् म्हणाले, नवीन सरकारने शपथविधी घेतल्यापासून सर्व नियम धाब्यावर बसवण्याचे काम सुरु केले आहे. नवीन अध्यक्ष निवडून येईपर्यंत हंगामी अध्यक्षच राहत असतो. पण त्यांनी दिलीप वळसे पाटील यांना नेमले आहे. आजपर्यंत विधानसभा अध्यक्ष आधी निवडला जात आणि नंतर विश्वासदर्शक ठराव मांडला जातो. 

महिला डॉक्टरवर बलात्कार करून जाळले, ४ जण अटकेत

विधानसभा अध्यक्ष हा गुप्त मतदान पद्धतीने होतो. पण हे खुल्या पद्धतीने मतदान घेण्याचा घाट रचला जात आहे. आमदारांना हॉटेलात डांबून ठेवले आहे. त्यांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधू दिला जात नाही. हिंम्मत असेल तर त्यांनी गोपनीय पद्धतीने मतदान घ्यावे, असे आव्हानच पाटील यांनी महाविकास आघाडीला दिले.

हैदराबाद : त्याच ठिकाणी आढळला दुसऱ्या महिलेचा जळालेल्या अवस्थेत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:the maha vikas aghadhi not taken the oath was as per rules the new Govt is violating all rules alleges by bjp leader chandrakant patil