पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कांद्याचे भाव पुन्हा २०-२५ रुपये किलो होण्याचा अंदाज, फक्त...

कांदा

परदेशातून आयात केलेला कांदा आणि शेतातून येणाऱ्या नव्या काद्यांमुळे किरकोळ बाजारात कांद्याचे भाव खाली येणार आहेत. पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत भाव खाली येतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

सामूहिक लग्न सोहळ्यात विवाहित तरुणाने केले मेहुणीशी लग्न, वाचा पुढे काय झाले...

जानेवारीच्या मध्यापासून घाऊक बाजारापेठांमध्ये कांद्याचे भाव २० ते २५ रुपये किलो इथपर्यंत खाली येऊ शकतात, असे लासलगाव येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी ब्लूमबर्गला सांगितले. सध्याच्या किरकोळ बाजारातील भावामध्ये पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत सुमारे ८० टक्क्यांपर्यंत घसरण होईल, असे दिसते. 

पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत नवा कांदा बाजारात येणार आहे. त्यामुळे सध्या मागणीच्या तुलनेत पुरेसा पुरवठा नसल्यामुळे वाढलेले भाव कमी व्हायला मदत होईल. कांद्याचे भाव वाढल्यामुळे महागाईचा निर्देशांकही वरच्या दिशेने गेला आहे. त्याचबरोबर कांद्याची चोरीचे प्रकारही घडले आहेत.

ऐकावे ते नवलच : मुंबईत २६० शेतकरी, प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभार्थी

कांद्याचे भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने कांदे निर्यातीला बंदी घातली. त्याचबरोबर कांदा आयात करण्यात आला आहे. पण अजून हा कांदा देशातील बाजारात आलेला नाही. २७ डिसेंबरपर्यंत हा कांदा पोहोचण्याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे तोपर्यंत भाव फार खाली येणार नाहीत, असे सांगितले जात आहे. सध्या किरकोळ बाजारामध्ये वाळलेला कांदा १२० ते १६० रुपये किलो दराने विकला जातो आहे. कांद्याच्या आकारानुसार आणि तो नवा आहे की जुना यानुसार त्याचे भाव निश्चित केले जात आहेत.