पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परस्पर सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही-कोर्ट

परस्पर सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही-कोर्ट

ठाण्यातील एका न्यायालयाने बलात्कारातील एका ५६ वर्षीय आरोपीला सोडण्याचे आदेश दिले आहेत. परस्पर सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना नोंदवली आहे. या व्यक्तीवर आपल्या चालकाच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. 

आधार 'सोशल'ला जोडण्याची सर्व प्रकरणे सुप्रीम कोर्टात

अतिरिक्त सत्र न्या. आर आर वैष्णव यांनी मागील आठवड्यातील आपल्या आदेशात म्हटले की, आरोपी दिलीप श्रीधर पाटीलविरोधात करण्यात आलेले बलात्काराचे आरोप सिद्ध करण्यात फिर्यादी पक्षाला पूर्णपणे अपयश आले आहे. फिर्यादी पक्षाच्या माहितीनुसार महिलेचा पती आरोपीकडे चालक म्हणून काम करत होता. आरोपीचे नेहमी त्यांच्या घरी येणे-जाणे असायचे. त्यामुळे त्यांच्यात जवळचे संबंध निर्माण झाले होते. 

पीएमसी बँकेत सव्वा दोन कोटी अडकले; हार्ट अटॅकने महिलेचा मृत्यू

फिर्यादीने म्हटले की, २०१४ मध्ये आरोपीने महिलेला एका लॉजमध्ये बोलवून बलात्कार केला. त्यानंतर अनेकवेळा त्याने बलात्कार केला. महिलेने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला बदनाम करण्याची आणि पतीला नोकरीवरुन काढण्याची धमकी दिली. २०१४ मध्ये पतीच्या मृत्यूनंतर आरोपीने संबंधित महिलेवर अनेकवेळा बलात्कार करुन पैसेही दिले. यामुळे त्रस्त झालेल्या महिलेने एक दिवस पोलिसांत तक्रार दिली. 

इक्बाल मिर्चीचा सहकारी हुमायूं मर्चंटला ईडीने केली अटक

आरोपीविरोधात कारवाई होऊ नये, असे संबंधित महिलेने आपल्या जबाबात म्हल्याचे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले. बचाव पक्षाच्या वकिलांनी केलेल्या चौकशीत महिलेने आरोपीबरोबर परस्पर सहमतीने शरीर संबंध ठेवल्याचे म्हटले होते. महिलेने याची माहिती आपल्या भावजयला दिल्याचे मान्य केले होते.

INX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना जामीन, पण तूर्त सुटका नाही

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:The court said that the consensual relationship was not rape released to the accused person