पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ठाण्यात खंडणी प्रकरणी भाजप नगरसेवकाला अटक

भाजप नगरसेवक नारायण पवार

ठाण्यामध्ये खंडणी प्रकरणी भाजप नगरसेवकाला पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी प्रकरणात फरार असलेले भाजप नगरसेवक नारायण पवार यांना अखेर कासारवडवली पोलिसांनी अटक केली. नारायण पवार यांच्यावर तीन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. नारायण पवार यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणामुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प २४-२५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर

२०१५ साली नारायण पवार यांनी तीन कोटींची खंडणी मागितली होती. याप्रकरणी नारायण पवार यांच्यासह चार जणांविरोधात कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार ही आरोपींनी संगनमत करुन जमिनीची कागदपत्रे तयार केली होती. त्या आधारे ठाणे महापालिकेत अर्ज करून बिल्डरकडे खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नारायण पवार यांनी तीन लाख रुपये घेतल्याचा देखील आरोप केला जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नारायण पवार फरार होते. अखेर त्यांनीच पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. 

शिवसेनेचं सावरकरांवरील प्रेम कायम आहे का बघू!- मुनगंटीवार

२०१५ साली हे प्रकरण झाले त्यावेळी नारायण पवार हे काँग्रेसचे नगरसेवक होते. काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या ते भाजपचे नगरसेवक असून ठाणे महापालिकेत ते भाजपचे गटनेते आहेत. खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर नारायण पवार यांनी अटकपूर्व जामिनासाठी आधी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी ठाणे न्यायालयात धाव घेतली. मात्र तिथे सुध्दा न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे. 

शेतकरी तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या