पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तांत्रिक कारणामुळे मुंबईतील CNG पुरवठा विस्कळीत, वाहनांना फटका

मुंबईतील टॅक्सी

मुंबईला केला जाणारा सीएनजीचा पुरवठा शुक्रवारी तांत्रिक कारणामुळे विस्कळीत झाला होता. याचा परिणाम शहरातील टॅक्सी, रिक्षा, बेस्ट बसेस यांच्या वाहतुकीवर झाला. शनिवारीही या कारणामुळे पुरवठा विस्कळीतच राहिल्यास त्याचा परिणाम शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे.

शिवसेना सोडून नारायण राणे यांनी चूक केली - गडकरी

उरणमधील ऑईल एँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीएनजी पुरवठा विस्कळीत झाला. या केंद्रातूनच मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडला सीएनजीचा पुरवठा केला जातो. महानगर गॅसकडून मुंबईतील १२ लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना पाईपद्वारे सीएनजीचा पुरवठा केला जातो. त्याचबरोबर शहरातील सात लाख वाहने सीएनजीवर चालतात.

शुक्रवारी सकाळी सर्वात आधी या तांत्रिक बिघाडाबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी मुंबईतील १३३ सीएनजी पंपांपैकी ६ गॅस पुरवठ्याअभावी बंद करावे लागले. सीएनजी पंपांवर मिळणाऱ्या गॅसचे वजन जास्त आहे, पण तो कमी प्रमाणात भरला जातो आहे. त्यामुळे वाहन चालकांना जास्त पैसे मोजावे लागताहेत, असे टॅक्सी संघटनेचे नेते अल क्वाड्रोस यांनी सांगितले. जर काही मोठा तांत्रिक बिघाड असेल, तर महानगर गॅसने पुरवठा बंद करून आवश्यक काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

पश्चिम महाराष्ट्रात पूरामुळे आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू

या संदर्भात शुक्रवारी महानगर गॅस लिमिटेडने एक निवेदन जारी केले. महानगर गॅस लिमिटेडकडे येणारा सीएनजी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे वडाळातील मुख्य केंद्राकडे होणारा पुरवठाही विस्कळीत झाला आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, शहरातील कुटुंबामध्ये होणारा पुरवठा सुरळीत असल्याचे महानगर गॅस लिमिटेडच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.