पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हातावरील 'टॅटू' संदर्भात मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

मुंबई हायकोर्ट

हातावरील टॅटूमुळे वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरवित निवड प्रक्रियेत डावलण्यात आलेल्या एका उमेदवाराच्या मदतीला मुंबई उच्च न्यायालय आले आहे. टॅटू हा काही रोजचे काम करण्यामध्ये अडथळा ठरू शकत नाही, असे न्यायालयाने आपला निकाल देताना सांगितले. त्याचबरोबर टॅटूमुळे मुलाखतीला न बोलावलेल्या संबंधित उमेदवाराला पुन्हा निवड प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाला दिले आहेत.

न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. गेल्या मार्च महिन्यामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये सहायक कमांडंट पदासाठी वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरविण्यात आल्याने एका उमेदवाराने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. हातावरील टॅटूमुळे त्याला या पदाच्या मुलाखतीसाठी वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरविण्यात आले होते. 

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्यांचा ६ महिने आधीच राजीनामा

या प्रकरणाच्या सुनावणीवेळी संबंधित तरुणाने सहायक कमांडंट पदासाठी आवश्यक असलेली लेखी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. मार्चमध्ये शारीरिक चाचणीवेळी उमेदवाराचे वजन जास्त असून त्याच्या हातावर टॅटू असल्याचे त्याला सांगण्यात आले. उमेदवार तरुणाने आपले वजन कमी केले. त्याचबरोबर लेझरच्या साह्याने त्याने हातावरील ९० टक्के टॅटू काढून टाकला. पण जेव्हा तो पुन्हा एकदा शारीरिक चाचणीला सामोरा गेला. त्यावेळी त्याला पुन्हा एकदा चाचणी अनुत्तीर्ण करण्यात आले. यावेळी त्याच्या हातावर टॅटू असल्यामुळे त्याला नाकारण्यात आले होते. यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल कऱण्यात आलेल्या युक्तिवादात नियमानुसार उमेदवाराच्या डाव्या किंवा उजव्या हातावर टॅटू असू नये. पोलिस दलात कार्यरत असताना कर्मचाऱ्याने सॅल्यूट केल्यावर त्याचा टॅटू दिसला नाही पाहिजे, असा नियम आहे 

मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा' बंगला मुंबई पालिकेचा थकबाकीदार

या संदर्भात निकाल देताना न्यायालयाने म्हटले आहे की, संबंधित उमेदवाराच्या उजव्या हातावर असलेला टॅट हा त्याच्या शर्टाच्या बाह्यांमध्ये लपला जातो आहे. त्यामुळे शर्ट घातल्यावर तो कोणाला दिसत नाही. त्या टॅटूच्या आधारावर त्याला वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरविणे योग्य नाही.