पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तारापूर एमआयडीसी स्फोट: अखेर कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल

पालघर-बोईसर MIDC कंपनीत मोठा ब्लास्ट झाल्याचे वृत्त

तारापूर एमआयडीसी स्फोटाप्रकरणी अखेर सहा दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारापूर एमआयडीसातील प्लॉट क्रमांक एम २ मध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी मालक नटवरलाल पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोईसर पोलिस ठाण्यात कलम ३०४ (अ), २८६, २८७, ३३७ आणि ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री साडेदहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या स्फोटामध्ये कंपनीचा मालक देखील जखमी झाला होता. 

कर्नाटक पोलिसांची मुजोरी; मंत्री यड्रावकर यांना ताब्यात घेऊन सुटका

पालघर जिल्ह्यात बोईसर येथे तारापूर एमआयडीसीतील एका कंपनीत ११ जानेवारी रोजी भीषण स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. हा स्फोट इतका भीषण होता की १० ते १५ किलोमीटर पर्यंतचा परिसर हादरला होता. या कंपनीमध्ये अमोनिअम नायट्रेट हे स्फोटक रसायन बनवले जात होते. या स्फोटाच्या हादऱ्यामुळे कंपनीच्या आवारातील एक इमारत कोसळली त्या ढिगाऱ्याखाली अडकून अनेक कामगार जखमी झाले होते. 

न्याय मिळण्यास उशिर होतोय याला 'आप' जबाबदार; 

तारापूर एमआयडीसीतील कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने मदत जाहीर केली. मृतकांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर केली. तसेच जखमींना संपूर्ण वैद्यकीय सहाय्य दिले जावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले होते.  

संजय राऊतांना पदावरुन दूर करा; संभाजी भिडेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी