पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईकरांची पाण्याची चिंता संपली; तानसा धरण ओव्हरफ्लो

तानसा धरण

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी महत्वपूर्ण असलेले तानसा धरण गुरुवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले. ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. लवकरच इतर धरण देखील भरुन वाहू लागतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

कर्नाटक : सभापतींनी ३ बंडखोर आमदारांना ठरवलं अपात्र

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर ऐवढी आहे. यामध्ये तानसा धरणाची पाणीसाठा क्षमता १.४५ दक्षलक्ष लिटर ऐवढी आहे. तर तुलसी धरणाची पाणीसाठा क्षमता ८०४६ दक्षलक्ष लिटर ऐवढी आहे. ताणसा धरणातून मुंबईला दिवसाला २४०० दक्षलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. त्यामधील १० टक्के पाणी पुरवठा हा शहराला केला जातो. 

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत तिसऱ्यांदा मंजूर

दरम्यान, ताणसा धरण हे ठाणे जिल्ह्यातल्या आटगावजवळ येते. तर तुलसी धरण हे संजय गांधी नॅशनल पार्कच्या आत आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, तानसा गुरुवारी २.५० वाजता ओव्हरफ्लो झाले. तानसा धरण गेल्यावर्षी १७ जुलै रोजी ओव्हरफ्लो झाले होते. तानसा धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे तानसासह वैतरणा नदीकाठच्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

रोहितनं विराटनंतर अनुष्कालाही केलं अनफॉलो!

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये सध्या ५८.८६ टक्के पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी या सातही धरणामध्ये ८२.३४ टक्के पाणीसाठा होता. महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मोडकसागर धरण देखील लवकरच भरेल. सध्या मोडकसागर धरणामध्ये ८४.०३ टक्के पाणीसाठा आहे.