पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PMC बँक घोटाळा प्रकरणी निलंबित संचालकालाही अटक

पीएमसी बँक घाटाळा प्रकरणी आणखी एकाला अटक

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी निलंबित बँक संचालक जॉय थॉमस याला अटक करण्यात आले आहे. याप्रकरणातील ही तिसरी अटक आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचे संचालक सारंग वाधवान आणि राकेश वाधवान या दोघांना अटक केली होती. 

पीएमसी बँक घोटाळा प्रकरण; बँकेच्या दोन संचालकांना अटक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावरुन सजबीरसिंग मठ्ठा यांनी या घोटाळा प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बँकेचे संचालक जॉय थॉमस, चेअरमन वरियम सिंग, बँकेचे इतर पदाधिकारी आणि संचालक वाधवान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.  

मुंबई महापालिका आर्थिक संकटात? खर्च कमी करण्याचे आदेश

उल्लेखनिय आहे की, बँक कामकाजामधील अनियमितता आणि एचडीआयएल कंपनीला दिलेल्या कर्जासंबंधी योग्य माहिती न दिल्याने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने काही निर्बंध घातले आहेत. बँकेने एकूण ८ हजार ८८० कोटी कर्जापैकी एचडीआयएल कंपनीला तब्बल ६ हजार ५०० कोटी कर्ज दिले होते. ही रक्कम एकूण कर्ज रकमेच्या ७३ टक्के इतकी आहे. परिणामी आरबीआयने कर्ज देण्यावर बंधन घातले असून बँकेतील खातेधारकांना त्यांचे पैसे काढण्यावरही मर्यादा घातली आहे. सुरुवातीला खातेधारकांना केवळ १० हजार रुपये काढणे शक्य होते. ही मर्यादा आता २५ हजार इतकी करण्यात आली आहे.