पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांचे भावस्पर्शी ट्विट

सुषमा स्वराज आणि अमिताभ बच्चन

माजी परराष्ट्र मंत्री आणि दिग्गज राजकीय नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे देशातील संपूर्ण राजकीय विश्व हादरले आहे. इतर क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

ट्विटरच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, एक अत्यंत दुःखदायक बातमी आली आहे. एक अत्यंत प्रबळ राजकीय नेत्या, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व आणि अदभूत प्रवक्त्या. त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना.

सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे धक्का, राहुल गांधी यांची श्रद्धांजली

सुषमा स्वराज यांच्यासोबतचा एक फोटोही अमिताभ बच्चन यांनी शेअर केला आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनाची माहिती मिळाल्यावर मंगळवारी रात्री उशीरा अमिताभ बच्चन यांनी हे ट्विट केले. मंगळवारी रात्री छातीत दुखू लागल्यामुळे सुषमा स्वराज यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे रुग्णालयातच निधन झाले.