पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सर्जिकल स्ट्राईकमुळे देशातील बेरोजगारी हटणार नाही, संजय राऊत यांचा टोला

संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रात लिहिलेल्या एका लेखात त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. मोदी हे 'लोकप्रिय नेते' आहेत. पण त्यांनी कलम ३७० हटवण्याचा घेतलेला निर्णय आणि सर्जिकल स्ट्राईक करणे हा वाढत्या बेरोजगारीवरील उपाय नाही, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.  

बविआचे बोईसरचे आमदार विलास तरे शिवसेनेत

नोटबंदी, जीएसटी, मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियासारख्या मोदी सरकारच्या धोरणावर त्यांनी हल्लाबोल केला. सरकार भारताची अर्थव्यवस्था ५ हजार अब्ज डॉलर करण्याचे स्वप्न पाहत आहे. पण दुसरीकडे देशात बेरोजगारांची संख्या वाढताना दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीसाठी सरकार पंडित नेहरु किंवा त्याच्या धोरणांना दोष देऊ शकत नाही. 

सेनेच्या आंदोलनामुळे १० लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालीःउद्धव ठाकरे

भाजपने २०१४ मध्ये देशात दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते. पण मागील वर्षी १.१० कोटी लोकांनी आपला रोजगार गमावला आहे. काही निर्णयांमुळे रोजगार धोक्यात आला. नोटबंदी, जीएसटीमुळे हे दिसून आले आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि कलम ३७० हटवण्यासारखी कामगिरी करणे हे देशभक्तिपर कृत्य आहे. पण लोकांच्या हातांना रोजगार उपलब्ध करुन देणे खरे देशकार्य असेल, असे राऊत यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. मोदी हे जगात लोकप्रिय बनले आहेत. पण बेरोजगारी अशीच वाढत राहिल्यास देशातील जनतेच्या संतापाचा उद्रेक उडेल.

पोटावर ११ वार करून महिलनं केला पतीचा खून