पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आरेच्या निर्णयाचे स्वागत, विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र

मुंबईतील आरे कॉलनीतील वृक्षतोडीस विरोध केला जात आहे

आरे कॉलनीतील वृक्षतोडीला सोमवारी सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींसह राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. आरे कॉलनीतील वृक्षतोड ताबडतोब रोखण्यात यावी यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष आक्रमक झाले होते. कोर्टाने वृक्षतोडीला स्थगिती दिल्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वागत करत सरकारवर जोरदार टीका केली आहे.

आरेमधील वृक्षतोडीला सुप्रीम कोर्टाची तूर्त स्थगिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'आरे'तील वृक्षतोड तात्काळ थांबवण्याचे आदेश दिल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह आहे. तमाम आंदोलकांचा हा विजय आहे. हुकूमशाही प्रवृत्तीला ही चपराक आहे. अंतिम निर्णय 'आरे'च्याच बाजूने लागणार याचा मला विश्वास आहे.' असे मत त्यांनी व्यक्त केले.

... यामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र 'सरकारने आधीच मोठ्यासंख्येने झाडं कापली आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. महाराष्ट्र शासनाने शनिवार आणि रविवार झाडे तोडण्यात केलेली घाई निंदनीय आहे.' असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

ताडोबा अभयारण्यातील मीरा वाघिणीचा मृत्यू

तर, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी असे म्हटले आहे की, 'सुप्रीम कोर्टाने वृक्षतोडीला स्थगिती दिली. मात्र राज्य सरकारने एका रात्रीत वृक्षतोड करुन आपला हेतू आधीच साध्य करुन घेतला. कोर्ट त्यावर योग्य तो निर्णय देईलच. मात्र सरकारने केलेल्या कृतीमुळे झालेले नुकसान भरुन येण्यास शेकडो वर्षे लागतील.' असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस