पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खारघरमध्ये अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

नवी मुंबईमध्ये अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून या अधिकाऱ्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे.

नवी मुंबईत शिवसेनेला धक्का; 200 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

रमेश शिंदे असं या आत्महत्या करणाऱ्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचे नाव आहे. रमेश शिंदे यांनी नवी मुंबईतील खारघर अग्निशमन केंद्रामध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रमेश शिंदे यांच्यावर वारंवार वरिष्ठांकडून जाच होत होता, असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. 

विधानसभा निवडणूक : राज्यात सोमवारी १०१ उमेदवारी अर्ज दाखल

दरम्यान, सोमवारी ठाण्यामध्ये देखील अशीच घटना घडली होती. कामाच्या ताणातून एका पोलिस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले धनाजी राऊत या पोलिस उपनिरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केली. वर्तकनगर येथील पोलिस वसाहतीत असलेल्या झाडाला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली.

नुसती युती नव्हे महायुती! पण.. फॉर्म्युला अद्यापही गुलदस्त्यातच