पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईकरांनो सावधान, पोलिसांच्या नावे फिरणारा तो मेसेज FAKE

फेक मेसेज

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या खोट्या गोष्टी या कोरोना विषाणू इतक्याच घातक आहेत असं लिहित मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना फेक व्हायरल मेसेजपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबई पोलिसांनी वेळा घालून दिल्या आहेत अशी पोस्ट पोलिसांच्या नावे व्हायरल होत आहे. मात्र ही पोस्ट फेक असल्यानं कृपा करुन ती व्हायरल करु नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. 

मुंबईकरांना घरीही मिळेल कोरोना टेस्टची सेवा

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक वस्तूंची दुकानं  खुली  ठेवण्यात आली आहेत. यात किराणा माल, भाजीपाला, केमिस्ट, दूधविक्रेते यांची दुकानं खुली राहणार आहे. पण मुंबई पोलिसांनी इथे खरेदी करण्यासाठी  वेळा दिल्या आहेत अशी पोस्ट व्हायरल होत आहे. त्यानंतर ट्विटर अकाऊंटवरुन मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनीदेखील मुंबईकरांना फेक मेसेज न पसरवण्याचं आवाहन केलं आहे. 

पहिल्या कोरोनाबाधित पुणेरी जोडप्याविषयी दिलासादायक बातमी

मी मुंबईचा पोलिस आयुक्त आहे, मी अशाप्रकारच्या कोणत्याही सूचना  केलेल्या नाहीत त्यामुळे या पोस्ट व्हायरल करण्यापूर्वी खातरजमा करुन घ्या असं त्यांनी म्हटलं आहे. 

कोणीही नोकरी गमावणार नाही याचीही खबरदारी घ्या!