पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अरे आवाज कुणाचा!, येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात विद्यार्थी निवडणुकीचा धुराळा

प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यातील अकृषी विद्यापीठांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घ्याव्यात, असे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. सरकारने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे या निवडणुका घेण्याचे निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवडणुका नेमक्या कशा घ्याव्यात, याबद्दल विद्यापीठाच्या आणि महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी सोमवारी मुंबईत एक कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती.

विधानसभा निवडणूक : भाजपचा तिकीट वाटपाचा फॉर्म्युला निश्चित

राज्यातील सर्व विद्यापीठातील आणि प्रमुख महाविद्यालयातील अधिकारी या कार्यशाळेसाठी उपस्थित होते. कार्यशाळेत निवडणुकीसाठीचे नियम, पद्धती आणि बंधने याबद्दल सर्वांना माहिती देण्यात आली. सुमारे २५ वर्षांनंतर राज्यात पुन्हा एकदा विद्यापीठ पातळीवर विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. अधिकाऱ्यांच्या विविध शंकांनाही या वेळी उत्तरे देण्यात आली.

विद्यार्थी निवडणुका कशा घ्यायच्या, याबद्दलची नियमावली तयार करून ती सर्व विद्यापीठांना देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रत्येक मुद्दा सविस्तरपणे लिहिण्यात आला आहे. तरीही अधिकाऱ्यांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी आणि या निवडणुका लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विद्यापीठ, महाविद्यालयांनी दिलेल्या वेळेत या निवडणुका घ्यायच्या आहेत, असे राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या एका सहायकाने सांगितले.

Health Tips : हे पाच पदार्थ तुमचा उदास मूड करतील ठिक

निवडणुकीचा कार्यक्रम ३१ जुलैपूर्वी जाहीर करायचा असून, ३० सप्टेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना विनोद तावडे म्हणाले, विद्यार्थ्यांकडे मोठी ऊर्जा असते. जर या ऊर्जेला योग्य दिशा मिळाली तर त्यामुळे सकारात्मक बदल घडून येतील. 

विद्यापीठांनीही महाविद्यालयांसाठी अशाच स्वरुपाच्या कार्यशाळा आयोजित कराव्यात, अशी सूचना यावेळी करण्यात आली.