पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाराज नाही पण बदनाम करणाऱ्यांची माहिती CM ठाकरेंना दिलीः अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार (ANI)

मी नाराज नाही, मी शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे पक्षाचे काम करत राहणार. पण माझी आणि शिवसेनेची बदनामी करणाऱ्यांची आणि माझ्या राजीनाम्याची पुडी सोडणाऱ्यांची नावे मी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असल्याची माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मातोश्रीबाहेर माध्यमांना दिली. 

माझ्यावर कंट्रोल 'मातोश्री'चा, तिथंच मी बोलणारः अब्दुल सत्तार

कॅबिनेट मंत्रिपद दिले नाही, त्यामुळे सत्तार यांनी नाराज होऊन मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त माध्यमांत आले होते. तसेच औरंगाबाद जिल्हापरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तार गटाच्या ६ सदस्यांनी भाजपला मतदान केल्यामुळे शिवसेनेचा उमेदवार पडल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. तसेच अब्दुल सत्तार हे गद्दार आहेत. त्यांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका, अशा शब्दात खैरे यांनी त्यांच्यावर घणाघाती हल्ला केला होता. त्या पार्श्वभूमीवर सत्तार हे रविवारी मातोश्रीवर मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटायला आले होते. 

अब्दुल सत्तार गद्दार, मातोश्रीची पायरीही चढू देऊ नकाः चंद्रकांत खैरे

मुख्यमंत्री ठाकरे आणि सत्तार यांच्यात सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी, एका वृत्त वाहिनीशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी सत्तार हे बोलबच्चन आहेत. ते आता मातोश्रीवर काहीही सांगतील, असा टोलाही लगावला. 

सत्तार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे आणि माझ्यात सविस्तर चर्चा झाली. जी घटना शनिवारी घडली त्याची सर्व माहिती मी त्यांना दिली. माझ्या राजीनाम्याची पुडी कोणी सोडली हे त्यांना सांगितले. मी राजीनामा दिल्याचे माझे हितचिंतक अफवा पसरवत आहेत. शिवसेनेची बदनामी व्हावी यासाठी अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत.

जनतेचे प्रश्न सोडवण्याचा उद्धव ठाकरेंना अनुभव नाहीः नारायण राणे

मुख्यमंत्री ठाकरे यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजता पुन्हा त्यांनी मातोश्रीवर बोलावले आहे. त्यावेळी पक्षाचे जिल्ह्यातील उर्वरित नेतेही उपस्थित असतील. 

जिल्हा परिषद निवडणुकीत सेनेचा एकही सदस्य फुटलेला नाही. तसेच वेळीच त्या सदस्यांना सन्मानाने बोलावले असते. समन्वय साधला असता तर हे झाले नसते, हे सांगण्यास सत्तार विसरले नाहीत. 

खातेवाटप झालं, वर्चस्व मात्र राष्ट्रवादीचंच

मी शिवसेनेचा आमदार आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली. ती पार पाडण्यास मी कोणतीही कसूर सोडणार नाही, असे सांगत आता या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्रीच खुलासा करतील, असेही म्हटले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:state minister shiv sena leader abdul sattar meets cm uddhav thackeray and says i am not angry on party