पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्य सरकार भीमा-कोरेगावचा समांतर तपास करणार, लवकरच SIT

कोरेगाव-भीमा चौकशी आयोगानेच राज्य सरकारला पत्र लिहिले

भीमा-कोरेगावचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आला आहे. आता राज्य सरकारही स्वतंत्र विशेत तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करणार आहे. राष्ट्रवादीचे नेत तथा अल्पसंख्यंक खात्याचे मंत्री नवाब मलिक यांनी याची माहिती दिल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भीमा-कोरेगावचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय घेतला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी दर्शवली होती. काँग्रेसनेही यावर प्रतिकूल मत व्यक्त केले होते. शरद पवार यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिले होते. त्याचदिवशी सायंकाळी केंद्र सरकारने एनआयएकडे तपास वर्ग करण्याचे निर्देश दिले होते. 

'...तर भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन करु'

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भीमा-कोरेगावचा राज्य सरकार समांतर तपास करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे म्हटले होते. शरद पवार यांनीही राज्य सरकारला समांतर तपास करता येते असे म्हटले होते. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची बैठक झाली. त्यात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

भीमा-कोरेगावः सर्व आरोपींना एनआयए कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:State government will carry out a parallel enquiry in Bhima Koregaon case through SIT says Nawab Malik