पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊन: जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश

छगन भुजबळ (Photo by Pramod Thakur/ Hindustan Times)

लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणे किंवा वस्तू भाव वाढून विकणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार आणि अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक  ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत.

कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असला तरी तो नॅशनल ट्रेंड नाही, कारण...

जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग आणि पोलीसांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची केंद्र सरकारची सूचना आहे.

आता प्रत्येक पात्र रेशनकार्ड धारकाला नियमित अन्न धान्याची खरेदी केल्यानंतर प्रती व्यक्ती ५ किलो तांदुळ त्या महिन्यात मोफत उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहितीही छगन भुजबळ यांनी दिली आहे.  राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांना म्हटले आहे.