पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... अखेर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला!

शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार. त्याचबरोबर मंत्र्यांचे खातेवाटप कधी जाहीर होणार, असे प्रश्न गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत. अखेर या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. २२ डिसेंबर किंवा त्याच्या नंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्याचवेळी मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर केले जाईल, अशी माहिती राज्यातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. 

अमृता फडणवीस अन् प्रियांका चतुर्वेदी यांच्यात जुंपली

राज्य विधीमंडळाचे पाच दिवसांचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरला सुरू होते आहे. नागपूरमध्ये हे अधिवेशन होणार आहे. हे अधिवेशन संपल्यावरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. त्याचवेळी खातेवाटपही केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मी आगीत अडकलोय, जिवंत वाचणार नाही; शाकीरचा गरोदर पत्नीला शेवटचा कॉल

२८ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत सहा मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोघांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण अद्याप या मंत्र्यांना खाते वाटप जाहीर करण्यात आलेले नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप या दोन्ही गोष्टी लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. त्यामुळे विस्ताराचा प्रश्न सातत्याने विचारला जातो आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईत बैठक झाली होती. त्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.