पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुरबाड-कल्याण महामार्गावर ST बस आणि खासगी बसची समोरासमोर धडक

दोन बसची समोरासमोर धडक

मुरबाड-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मडके फाट्याजवळील सरळगाव येथे एसटी महामंडळाची बस आणि खासगी बस यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. यात १० ते १२ प्रवासी जखमी झाल्याचे समजते. यातील दोन जण गंभीर जखणी असल्याचे वृत्त आहे. 

मंकी हिल ते कर्जत दरम्यान ३० नोव्हेंबरपर्यंत मेगाब्लॉक

खासगी बसही उल्हासनगर येथील असून शिर्डीवरुन उल्हासनगरकडे परत येत असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातामध्ये दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.