पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत स्पाईसजेटचे विमान घसरले, ५४ विमाने इतरत्र वळविली

घटनास्थळाचे छायाचित्र (सौजन्य एएनआय)

मुंबईतील विमानतळावर स्पाईसजेट कंपनीचे जयपूर ते मुंबई विमान सोमवारी रात्री धावपट्टीवरून घसरले. या विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. पण या घटनेमुळे मुंबई विमानतळावरील विमानांची उड्डाणे विस्कळीत झाली आहे. एकूण ५४ विमाने इतरत्र वळविण्यात आली असल्याची माहिती मुंबईतील विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली.

Mumbai Rain Live Updates : मुंबईत सार्वजनिक सुटी, लोकलसेवा विस्कळीत

मुंबईत सोमवारी संध्याकाळपासून जोरात पाऊस पडतो आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे दिसत आहे. अशातच जयपूरहून मुंबईला आलेले स्पाईसजेटचे विमान धावपट्टीवर उतरत असतानाच घसरले. विमान धावपट्टी सोडून शेजारील जमिनीवर गेले. या घटनेनंतर विमानतळावरील संबंधित धावपट्टी पुढील उड्डाणांसाठी बंद करण्यात आली.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असून, त्यांना विमानातून बाहेर काढण्यात आले आहे. हे विमान धावपट्टीवरून हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पण हे विमान घसरल्यामुळे आणि जोरदार पावसामुळे मुंबईतील विमान वाहतूकही सोमवारी रात्रीपासून विस्कळीत झाली आहे.