पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्राला लागलेले ग्रहण लवकरच सुटणार, संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

संजय राऊत

गेल्या काही दिवसांपासून रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे देऊन राजकीय खळबळ उडवून देणारे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी लवकरच राज्यात शपथग्रहण सोहळा होईल आणि महाराष्ट्राला लागलेले ग्रहण सुटेल, असे सूचक वक्तव्य केले. त्याचवेळी महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेचा निर्णय महाराष्ट्रातच होईल इतर कुठेही होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'मावळते मुख्यमंत्री' म्हणत शिवसेनेने फडणवीसांना डिवचले

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे ही इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस आणि आमचे नेते उद्धव ठाकरे यांची आहे. सध्या फक्त न्याय आणि सत्याची लढाई सुरू आहे. पण यामध्ये विजय शिवसेनेचाच होईल आणि राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री पदावर विराजमान होईल, असे त्यांनी सांगितले.

निवडणूक निकाल लागल्यानंतर राज्यात प्रत्येक पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. कालच शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आमच्या आमदारांची संख्या आणखी वाढली असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

'तरूण भारत'मधून पुन्हा एकदा संजय राऊतांवर टीकास्त्र

माझे शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. ते देशाचे मोठे नेते आहेत. त्यांच्याशी बोलणे हा काही अपराध नाही. केवळ मीच नाही तर अन्य पक्षांचे कोण कोण शरद पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करताहेत, हे सुद्धा मला माहिती आहे. शरद पवार महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होणार नाहीत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.