पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डेक्कन क्वीनच्या डब्यांत, डायनिंग कारमध्ये नव्या वर्षात मोठा बदल

डेक्कन क्वीन

मुंबई-पुणे या शहरांमध्ये धावणाऱ्या प्रसिद्ध डेक्कन क्वीन रेल्वेमध्ये लवकरच प्रवाशांना बदल दिसणार आहेत. मार्च २०२० मध्ये या रेल्वेत अद्ययावत एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या रेल्वेचे महत्त्वाचे आकर्षण असलेला डायनिंग कारचा डबाही नव्या रचनेत वातानुकूलित करण्यात येणार आहे. रोज हजारो प्रवासी या रेल्वेने पुणे-मुंबई असा प्रवास करतात.

'आमच्याविरोधात काम करणाऱ्यांचे पुरावे पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द'

डेक्कन क्वीनच्या डब्यामध्ये बदल करण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होती. पण आता त्याचा महिना निश्चित झाला आहे. या रेल्वेचे सर्व जुने डबे काढून नव्या जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे या गाडीला जोडण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नव्या रचनेत गाडीला वातानुकूलित डायनिंग कार असणार आहे. या डब्यामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी जास्त जागा असेल. त्यामुळे डायनिंग कारमध्ये बसून अधिक प्रवासी गाडीतील खाद्यपदार्थांचा आनंद लुटू शकतात. मध्य रेल्वेकडे जानेवारीमध्ये नवे डबे येतील. त्यानंतर हे डबे गाडीला जोडले जातील.

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती

एलएचबी डबे हे वजनाला हलके असतात. त्याचबरोबर त्यामध्ये अधिक प्रवासी बसण्याची क्षमता असते. या डब्यांची ब्रेक व्यवस्थाही अत्याधुनिक असून, अपघातामध्ये गाडीचे डबे एकमेकांवर आदळण्याची शक्यता या डब्यांमध्ये खूप कमी असते.