पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोनिया गांधींकडून उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे शुभेच्छा

सोनिया गांधी

राज्यामध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर त्यांच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे प्रत्येकी दोन-दोन नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवतिर्थ्यावर हा भव्य दिव्य शपथविधी सोहळा होणार असून शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाही. मात्र सोनिया गांधी यांनी पत्र पाठवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिक्षणाचा 'विनोद' होऊ देणार नाही; जयंत पाटलांचा तावडेंना टोला

सोनिया गांधींनी पत्रात असे म्हटले आहे की, 'तुमच्या नवीन राजकीय कारकिर्दीला माझ्याकडून शुभेच्छा. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करेल. मी या शपथविधीला उपस्थित राहू शकत नाही. तसंच देशाला भाजपपासून धोका असल्याचे देखील त्यांनी या पत्रात म्हटले आहे. भाजपच्या एकाधिकारशाहीला देशातील जनता तोंड देत आहे. भाजपमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.', असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.

मी बंड केलं नाही, तर भूमिका मांडली: अजित पवार

दरम्यान, सोनिया गांधी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांना देखील पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यामध्ये तब्बल २० वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत आहे. उद्धव ठाकरे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी शिवतिर्थावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील राजकीय नेत्यांसह शेतकऱ्यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. 

मी बंड केलं नाही, तर भूमिका मांडली: अजित पवार