राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. गुरुवारी संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. तर इतर मंत्र्यांचा देखील शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरजरीवाल आणि डीएमकेचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
महाविकास आघाडीत या पक्षाकडे जाणार ऐवढी मंत्रिपदं?
अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसंच सोनिया गांधी यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आले असल्याचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांना, ममता बॅनर्जी, केजरीवाल यांना निमंत्रण पाठवण्यात आले असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार यांनी सांगितले.
शपथविधी सोहळा: बळीराजाला मिळणार मानाचे स्थान
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे मंत्री उद्या शपथ घेणआर आहेत. संध्याकाळी ६.४० वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. या शपथविधी सोहळ्याला राजकीय नेत्यांसोबत राज्यभरातील ४०० शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसंच राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देखील बोलावण्यात आले असल्याचे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे.