पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यात बदल

जयंत पाटील आणि छगन भुजबळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले असून, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मान्यता दिली आहे.

भाजप असल्यामुळे बेरोजगारी शक्य आहे - प्रियांका गांधी

जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते जयंत पाटील यांना देण्यात आले असून, अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे.

'फडणवीसांच्या कोणत्याही वक्तव्याकडे आम्ही गांभिर्याने पाहत नाही'

याच आठवड्यात राज्य मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले. गेल्या महिन्यात सत्तेवर आल्यानंतर बऱ्याच दिवसांपासून खातेवाटप जाहीर करण्यात आले नव्हते. येत्या सोमवारपासून राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होते आहे. त्या पार्श्वभूमीवर खातेवाटप करणे आवश्यक असल्यामुळे अखेर या आठवड्यात सहा मंत्र्यांमध्ये खातेवाटप करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या सहा मंत्र्यांमध्ये खातेवाटप करण्यात आले असून, या सहाजणाव्यतिरिक्त उरलेली सर्व खाती उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अपेक्षित आहे.