पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नियम म्हणजे नियम, अगदी जीवनावश्यक वस्तूंसाठीही घराबाहेर पडले नाहीत रहिवाशी

कोरोना

राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. गरज असेल तर आणि तरच बाहेर पडा, घरीच थांबा आणि सुरक्षित राहा अशी विनंती वारंवार मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र आजही राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊनच्या काळातही  नियम पायदळी तुडवून रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या कमी नाही. सर्व दुकानं बंद असली तरी राज्यात फळे, भाजी, किराणा, केमिस्ट, दूध केंद्र अशी जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली ठेवण्यात आली आहे. मात्र वारंवार बजावूनही इथेही गर्दी पहायला मिळत आहे.

कोरोनाविरोधातील लढ्याचे नेतृत्त्व करणारी मराठमोळी व्यक्ती

अशावेळी अगदी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीही घराबाहेर न पडणाऱ्या नवी मुंबईतील जय बालाजी कोऑपरेटीव्ही सोसायटीमधील रहिवाशांचं खूपच कौतुक होत आहे.  स्वत:च्या आणि परिवाराच्या सुरक्षेसाठी १ हजार रहिवाश्यांनी घरातून बाहेर न पडण्याचं ठरवलं आहे.  सात इमारतीच्या या सोसायटीमध्ये २०० सदनिका आहेत.  मात्र या सदनिकांमध्ये लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत कोणीही घराबाहेर पडलं नाही. सोसायटीमधील प्रत्येक कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंची सोय घरपोच दिली जाते. यासाठी सोसायटीमधल्या रहिवाशींनी मिळून एक कौतुकास्पद उपक्रम तयार केला आहे.

ऑनलाइन किराणा सामान मागवणाऱ्या अभिनेत्रीच्या बहिणीला २५ हजारांचा गंडा

इथल्या सोसायटीमधील रहिवाशांनी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. प्रत्येक कुटुंब त्यांना आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंची यादी या ग्रुपवर पाठवतो. सर्व कुटुंबांची यादी एकत्र करुन सामान आणलं जातं.  सामान आणल्यानंतर प्रत्येक सदस्याला त्याबाबत कळवण्यात येते. नंतर या सामानाची वर्गवारी करुन  ते प्रत्येक कुटुंबीयांच्या दारात ठेवलं जातं. हे करत असताना कोणाशीही प्रत्यक्ष  संपर्क येणार नाही याची खबरदारी घेतली जाते.

कोरोनाशी लढा : खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतले १४६ परिसर सील

सोसायटीमधील १५ लोक आणि ११ सुरक्षारक्षकांच्या मदतीनं २०० कुटुंबांच्या जीवनावश्यक सोयींची काळजी घेतली जाते अशी माहिती या सोसायटीच्या अर्चना लोकेश्वर यांनी दिली.