पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभा विजयानंतर १४ किलोमीटर अनवाणी चालत स्मृती इराणींनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

स्मृती इराणी

लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजय झाला. या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी या अमेठीमधून  राहुल गांधी यांच्याविरोधात उभ्या ठाकल्या होत्या. अमेठी हा खरं तर काँग्रेसचा मतदारसंघ मात्र याच मतदारसंघात काँग्रेसचा दारूण पराभव झाला आणि स्मृती  इराणी विजयी ठरल्या. दोन्ही पक्षांसाठी ही लढत अत्यंत  प्रतिष्ठेची होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यामध्ये झालेल्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अमेठीमधल्या विजयानंतर स्मृती इराणी मुंबईतलं प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायकाच्या मंदिरात पोहचल्या. विशेष म्हणजे त्या १४ किलोमीटर पायी चालत गेल्या. 

स्मृती इराणी यांची मैत्रीण आणि निर्माती एकता कपूरसोबत त्या  मंदिरात सिद्धिविनायकाच्या दर्शनाला  आल्या होत्या. राजकारणात येण्यापूर्वी स्मृती छोट्या पडद्यावरच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. एकता कपूरच्या मालिकेतून स्मृती इराणी या नावारूपाला आल्या. मालिका संपल्यानंतरही या दोघींची मैत्री कायम राहिली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

14 kms to SIDDHI VINAYAK ke baaad ka glow 😂

A post shared by Erk❤️rek (@ektaravikapoor) on

एकता कपूरनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. यावेळी  एकताचं लहान मुलंही सोबत होतं. अमेठीच्या विजयानंतर बाप्पांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या १४ किलोमीटर पायी चालत गेल्याचं  एकतानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.