पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकल अपघातात शुक्रवारी सर्वाधिक मृत्यूची नोंद, १६ जणांनी गमावले प्राण

मुंबई लोकल

मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर शुक्रवारी झालेल्या विविध अपघातात एकूण १६ जणांनी प्राण गमावले आहेत. या वर्षांतला हा सर्वाधिक आकडा आहे. मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर शुक्रवारी २९ प्रवाशांचे अपघात झाले. यात झालेल्या विविध अपघातात १६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून उर्वरित प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ७ पुरुष आणि एका महिलेची ओळख पटली आहे तर ८ मृतदेहांची ओळख अजूनही पटायची आहे. 

२९ अपघातांपैकी १३  जण जखमी झाल्याची माहिती जीआरपीनं दिली आहे. रूळ ओलांडताना किंवा गच्च भरलेल्या ट्रेनमधून पडून हे मृत्यू झाले असल्याचं समजत आहे.  यात कुर्ला, ठाण्यात प्रत्येकी तीन, डोंबिवली, कल्याण प्रत्येकी दोन, वाशी, पनवेल, मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरिवली आणि वसईत प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 

गेल्यावर्षी  रेल्वे अपघातात २ हजार ९८१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यातले १ हजार ६१९ मृत्यू हे रूळ ओलांडताना झाले होते तर ७११ प्रवाशांनी ट्रेनमधून पडून आपले प्राण गमावले होते. मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाइन आहे. लोकलनं ८० लाख प्रवाशी दररोज प्रवास करतात यात दरदिवशी ८ जण हे रेल्वे अपघातात प्राण गमावतात.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sixteen people lost their lives in mishaps on Mumbai suburban railway network highest number recorded in a single day