पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उदित नारायण यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी घराबाहेरील गस्त वाढविली

उदित नारायण

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात पार्श्वगायक उदित नारायण यांना धमकी देणारे फोन आल्यामुळे त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार पुढील तपासासाठी खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल केलेला नसला, तरी तपास सुरू करण्यात आला आहे. 

मुंबईतील IIT च्या वर्गात आलेला पाहुणा बघून विद्यार्थ्यांना धक्का

ज्या मोबाईलवरून हे फोन आले, त्याचा शोध पोलिसांनी लावला असून, तो मोबाईल चोरीचा असल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात अबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत गायकवाड म्हणाले, उदित नारायण यांचा जबाब आम्ही नोंदवून घेतला आहे. या प्रकरणात त्यांना धमकी देण्यात आलेली असल्यामुळे आम्ही त्यांचा जबाब गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे पाठविला आहे. धमकीच्या प्रकरणात याच पद्धतीने तपास केला जातो. 

उदित नारायण यांनी दिलेल्या जबाबानुसार, फोन करणारी व्यक्ती त्यांना धमकावित होती आणि शिवीगाळ करीत होती. पोलिसांनी त्यांच्या घराजवळील गस्त वाढविली आहे. त्याचबरोबर साध्या वेशातील पोलिस त्यांच्या घराजवळ तैनात करण्यात आले आहेत. 

ढिंच्याक पूजा पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये, ट्विटरवर मीम्सचा पूर!

खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याभराच्या काळात उदित नारायण यांना धमकीचे तीन फोन कॉल आले होते. एकाच क्रमांकावरून हे कॉल करण्यात आले होते. उदित नारायण कधी घरातून बाहेर पडतात हे मला माहिती आहे. गरज पडल्यास त्यांना जीवे मारण्यात येईल, अशीही धमकी फोन करणाऱ्या व्यक्तीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. 

उदित नारायण मुंबईत जिथे राहतात. त्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाच्या नावावर असलेल्या मोबाईल क्रमांकावरून हे कॉल करण्यात आल्याचे पोलिस तपासात आढळले आहे.