पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अब्दुल्ल सत्तारांच्या हाती भगवा, सिल्लोडमधून उमेदवारीही जाहीर

अब्दुल सत्तार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला

लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचा त्याग केलेले मराठवाड्यातील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार अखेर शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सिल्लोड मतदारसंघातून सत्तार यांची उमेदवारीही जाहीर केली. विशेष म्हणजे राज्यातल्या पक्षनेतृत्वावरच टीका करत काँग्रेसचा त्याग केलेले सत्तार हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. पण सिल्लोडमधील भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांनी याला तीव्र विरोध केला होता. अखेर सत्तार यांनी आज (सोमवार) शिवसेनेत प्रवेश केला.  

कलम ३७० हटवणं कुणालाच जमलं नसतं : अमित शहा

अब्दुल सत्तार सिल्लोड मतदार संघातून निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी ते औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. परंतु, पक्षनेतृत्वाने त्यांच्याऐवजी सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी सत्तार यांनी उघडपणे बंड केले होते. त्यांनी भाजपच्या नेत्यांशी सलगीही वाढवली होती. ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याचवेळी सिल्लोडच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा त्यांना मोठा विरोध दिसून आला. अखेर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

इतक्या वर्षांत साहेब पहिल्यांदाच चिडलेः सुप्रिया सुळे

सिल्लोड मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनला मिळवून देण्याची जबाबदारी मी सत्तार यांच्याकडे देत असल्याचे सांगत ठाकरे यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली. सत्तार यांनीही राज्यात आपण जी जबाबदारी द्याल ती पार पाडेन, असे सांगत मराठवाड्यातून ऐतिहासिक मतांनी विजय मिळवू असा विश्वास व्यक्त केला.

भुजबळांची शिवसेनेत घरवापसी होणार का? तर्कवितर्कांना उधाण